गुटखा विक्री प्रकरणी तरुणाला अटक: धुळ्याच्या पुरवठादारावरही गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/gutkha-karwai.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
गुटखा विक्री प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून 50 हजारांचा गुटखा जप्त केला आहे. तसेच त्याने ज्याच्याकडून हा गुटखा आणला त्या पुरवठादारावर देखील गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 2) रात्री सात वाजता काळेवाडी येथे करण्यात आली.
मोहित प्रभाकर कानडे (वय 22, रा. काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह पावबा चव्हाण (रा. धोंडाईचा, धुळे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार तुषार शेटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आरोपीने विक्रीसाठी ठेवला. याबाबत माहिती मिळाली असता गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी सोमवारी रात्री छापा मारून कारवाई केली त्यात 50 हजार 420 रुपयांचा गुटखा, सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली. मोहित कानडे याने हा गुटखा पावबा चव्हाण याच्याकडून आणला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.