Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘शिक्षणाचं व्यवसायीकरण होणं चुकीचं’; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आपलं परखड मत मांडत असतात. त्यांनी आता राज्य, देशातील शिक्षण व्यवस्थेवर भाष्य केलं आहे. शिक्षणाचे व्यावसायिकरण होता कामा नाये. शिक्षणाचा जो आत्मा आहे तो कायम राहायला हवा. सरकारकडे पैसा कमी आहे. त्यामुळे विनाअनुदानाशिवाय पर्याय नाही, असे गडकरी म्हणाले.

एका कॉफी शॉपमध्ये काम करणारा मुलगा…

स्टार बक्स विषयी माहिती देणारे मी पुस्तक वाचले होते. जगामध्ये तुम्ही सगल्या गोष्टी करू शकता. एका कॉफी शॉपमध्ये काम करणारा मुलगा एवढं मोठं यश मिळवू शकतो, असे उदाहरण देत नितीन गडकरी यांनी तरुणांनी आपल्या स्वप्नांसाठी झगडले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

शिक्षणाचा व्यवसाय होता कामा नये

तसेच शिक्षण व्यवस्था आणि शिक्षणाच्या माध्यमातून शिकवली जाणारी मूल्ये यावरही त्यांनी भाष्य केलं. महाराष्ट्राच्या विधानभवनात आमदार असताना विनाअनुदाणाचा विषय आला होता. गोष्ट खरी आहे की सरकारजवळ पैसे कमी आहेत. त्यामुळे विनाअनुदानाशिवाय पर्याय नाही. मात्र शिक्षणाचा जो आत्मा आहे, तो कायम राहायला हवा, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. तसेच शिक्षणाचा व्यवसाय होता कामा नये. पण आता शिक्षणाचे व्यावसायीकरण झाले आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. शिक्षण क्षेत्रामध्ये फिजिक्स फार महत्त्वाचे आहे. ज्यांनी शिक्षणामध्ये मूल्ये पाळली भविष्यातले चांगले नागरिक आहेत, असेही गडकरी बोलताना म्हणाले.

हेही वाचा –  माटे हायस्कूलमध्ये योग दिन उत्साहात साजरा

कितीही वादळ आली तरी…

त्यांनी राज्यातील सहकाराविषयीही भाष्य केले. आपल्या सहकार क्षेत्रात अनेक जणांनी खूप चांगलं काम केलं आहे. सहकारी संस्थेला जर लीडरशिप चांगली असेल तर, कितीही वादळ आली तरी संस्था योग्य दिशेने जाते, असे गडकरी सहकार क्षेत्राविषयी बोलताना म्हणाले.

गडकरी यांनी सांगितला खास किस्सा

पुढे गडकरी यांनी लिव्हइन रिलेशनशीप आणि संस्कार यावर भाष्य केलं. एकदा लंडनच्या पार्लमेंटला गेलो होतो. तेव्हा मला तिथल्या प्रधानमंत्र्यांनी विचारलं की तुमच्या देशातले सगळ्यात मोठी समस्या कोणते. मी सांगितले की गरिबी ही मोठी समस्या आहे. नंतर मी त्यांना विचारलं की तुमची समस्या काय आहे? ते म्हणाले की आमचं सामाजिक जीवन उद्ध्वस्त झाल आहे. कारण आमच्याकडे मुल लिव्हइन रिलेशनशिपमधे राहतात आणि सोडून देतात. कळत नाही पुढे जाऊन काय होईल, अशी आठवण गडकरी यांनी सांगितली.

सुशिक्षित असणे आणि सुसंस्कृत असणे यात फरक आहे. ज्ञानी असणे आणि उत्तम माणूस असणे यात फरक आहे. ज्ञानी असलं पाहिजे. मात्र त्यापेक्षा महत्वाचा आहे की ह्यूमन बीइंग असलं पाहिजे, असेही गडकरी म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button