‘इंद्रायणीनगरच्या नियोजनात्मक विकासाची भूमिका कायम राखणार’; तुषार सहाणे
दहा वर्षातील बकालता, टपऱ्यांचे साम्राज्य, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी

शांत इंद्रायणीनगरची ओळखच सत्ताधाऱ्यांनी पुसली; नागरिकांचा आरोप
पिंपरी चिंचवड: इंद्रायणीनगरसारख्या शांत आणि नियोजनबद्ध परिसराचा आगामी काळात नियोजनात्मक विकास कायम राखण्याची भूमिका आपण ठेवणार असल्याचे आश्वासन तुषार सहाणे यांनी नागरिकांना दिले. गेल्या काही वर्षांत या भागात वाढलेली बकालता, अनधिकृत टपऱ्यांचे साम्राज्य आणि नियोजनाचा अभाव यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. “गेल्या दहा वर्षांत परिसराचा शिस्तबद्धपणा कमी झाला असून, परिवर्तनाची नितांत गरज आहे,” असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले.
इंद्रायणी नगर प्रभाग क्रमांक 8 मधून पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून तुषार सहाणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उच्चशिक्षित, तरुण नेतृत्व म्हणून नागरिकांची तुषार सहाणे यांना पसंती मिळत आहे. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुषार सहाणे यांनी या भागात जनसंपर्क वाढवला असून, विशेषतः तरुण वर्गाकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
प्रचारादरम्यान तुषार सहाणे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तरुणांच्या उद्योगनिर्मितीला चालना देणे, स्वावलंबनासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि स्थानिक पातळीवर आर्थिक बळकटी निर्माण करणे, हाच आपला अजेंडा आणि हेच आपले व्हिजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केवळ आश्वासनांपुरते न थांबता प्रत्यक्ष उपाययोजनांवर भर देण्याची भूमिका त्यांनी मांडल्याने मतदारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा – गडचिरोली पोलीस दलाच्या बळकटीसाठी ३४ नव्या वाहनांचा ताफा दाखल

पदयात्रेदरम्यान नागरिकांचा मोठा सहभाग
महाराष्ट्र कॉलनी परिसरात काढण्यात आलेल्या पदयात्रेदरम्यान नागरिकांचा मोठा सहभाग दिसून आला. महिलांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या, तर अनेकांनी “तुषारभाऊ हे केवळ लोकप्रतिनिधी नसून प्रत्येक कुटुंबाचा आधार आहेत,” अशी भावना व्यक्त केली. संकटाच्या वेळी धावून जाणारा नेता अशी त्यांची ओळख असल्याचेही नागरिक यावेळी म्हणाले.

इंद्रायणी नगरची ओळखच सत्ताधाऱ्यांनी पुसली
दरम्यान, इंद्रायणी नगरसारख्या पूर्वी शांत असलेल्या भागाला विद्यमान सत्ताधाऱ्यांनी अशांत केल्याचा गंभीर आरोप काही नागरिकांनी केला आहे. वाढती अतिक्रमणे, अस्वच्छता आणि नियोजनाचा अभाव यामुळे परिसराच्या ओळखीला धक्का बसल्याचे मत व्यक्त होत आहे. त्यामुळेच तुषार सहाणे यांच्या रूपाने तरुण, सक्रिय आणि विकासाभिमुख नेतृत्वाची अपेक्षा नागरिक ठेवून आहेत.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“इंद्रायणी नगरचा सर्वांगीण, नियोजनबद्ध विकास आणि पुन्हा एकदा या भागाची शांत ओळख जपणे हेच आमचे उद्दिष्ट आहे,” महापालिकेच्या सभागृहात नागरिकांचे प्रश्न मांडणे. प्रभागाची सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवणे इंद्रायणीनगरसाठी आगामी काळात विकासाची भूमिका कायम राखणे हाच संकल्प आहे.
– तुषार सहाणे,माजी प्रमुख विश्वस्त जेजुरी देवस्थान





