#Waragainstcorona: पिंपरी-चिंचवडमध्ये प्रभागनिहाय धान्यवाटप; महापौर माई ढोरे यांची माहिती (व्हीडिओ)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/9-9.jpg)
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय धान्यवाटप करण्याबाबतची मागणी महापौर माई ढोरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोरोना विषाणु संसर्गाचा धोका निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य नागरिकांची अन्नधान्याविना हाल होत आहेत. त्यामुळे लॉकडाउनच्या कालावधीकरिता मोफत धान्य वाटप् करणे आवश्यक आहे.
त्यामुळे संचारबंदीच्या काळात सर्व सामान्य नागरिकांना रेशन दुकानांवर तांदूळ व गहू मिळत आहेत. परंतु, वितरणातील अडचणींमुळे अनेक नागरिकांना एकवेळचे अन्न मिळण्यातही अडचणी येत आहेत. गरिब व हातावर पोट असणारे नागरिक मदतीसाठी दारोदार फिरत असून, मदतीसाठी नगरसदस्यांकडे येत आहेत. त्यामुळे प्रत्येक नगरसदस्यांना त्यांच्या प्रभागात धान्य वाटप करणे कमी प्रत्येकी रक्कम रुपये ५ लाखाचे धान्य खरेदी करुन वाटप करण्याबात नजीकच्या स्थायी समिती सभेमध्ये हा विषय ठेवण्यात यावा, अशी सूचना महापौर माई ढोरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना केली आहे.
व्हीडिओ पहा…