# War Against Coroana : चाकणमध्ये अंडीविक्रेता कोरोनाबाधित; 181 जणांना होमक्वारंटाईन!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/626563-manufacturing-sector-112217.jpg)
चाकण। महाईन्यूज । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड परिसरातील एक अंडीविक्रेता कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. या अंडीविक्रेत्याने जवळपास 85 किरकोळ विक्रेत्यांना अंडीविक्री केली. इतकंच नाही तर त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर 181 जणांना होमक्वारंटाईन करण्यात आलं आहे.
हा कोरोनाबाधीत अंडीविक्रेता पिंपरी-चिंचवडमधील उपनगरात अंड्यांची विक्री करत होता. त्याने कुठल्या कुठल्या भागात अंडीविक्री केली त्याचा तपास चाकण नगरपालिका प्रशासनाने घेतला. त्यामध्ये या विक्रेत्याने चाकणच्या नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, खराबवाडी या भागात तब्बल 85 किरकोळ विक्रेत्यांना अंड्यांची विक्री केल्याची बाब समोर आली.
त्यामुळे चाकण नगरपालिका वैद्यकीय विभागाने तब्बल 85 किरकोळ अंडी विक्रेता आणि त्यांच्या संपर्कात आलेले असे एकूण 181 जणांना तात्काळ होम क्वारंटाईन होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चाकण नगरपालिकेने शहरातील 81 अंड्यांची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आणखी किती जणांना या कोरोनाबाधित विक्रेत्याने अंडी विकली आहेत, त्याचा तपास चाकण नगरपालिका तसेच चाकण पोलीस प्रशासन करत आहेत.