‘विवेकानंद यांना अभिप्रेत युवक घडावा’; प्रा. प्रदीप कदम
सावंत, भोसले यांना विवेकानंद पुरस्कार प्रदान
पिंपरी- चिंचवड : व्यसनापासून मुक्त आणि ज्याच्या जीवनाला शिस्त, देवावर भक्ती आणि आयुष्याची नीती, गुरूंचा आदर आणि पालकांवर श्रद्धा, ज्याच्या मनात राष्ट्रप्रेम आणि हृदयात करुणा अशा युवकांची आज समाजाला गरज आहे. स्वामी विवेकानंद यांना अभिप्रेत असा युवक आज घडला पाहिजेत . राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवरायांना घडवताना रयतेच्या वेदना जाणून घेऊन विचारपूर्वक समाजाभिमुख कृती करण्यासाठी प्रशिक्षण आणि शिक्षण दिले. घरच्या घरी यशस्वी प्रशिक्षण देणारी या देशातली पहिली आई म्हणजे जिजाऊ आहेत. असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. प्रदीप कदम यांनी केले.
शरद नगर येथील स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त, स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार गीता चंद्रकांत सावंत- सातपुते तर भक्त पुंडलिक पुरस्कार चंद्रकांत भोसले यांना प्रदान करण्यात आला. यावेळी स्वामी विवेकानंद जयंती दिवशी प्रा कदम यांनी ” स्वामी विवेकानंद -प्रेरणा युवकांसाठी ” याविषयावर व्याख्यान दिले. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा – महाकुंभ मेळ्याला आजपासून सुरूवात; कशी झाली कुंभमेळ्याची सुरुवात?
यावेळी उपनिबंधक नितीन काळे , पश्चिम महा.देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, कामगार नेते सचिन लांडगे, हिंदू प्रतिष्ठानचे अध्यक्ष उत्तम दंडिमे, केशव मोरे, महादेव कवितके, अध्यक्ष रामराजे बेंबडे, कार्याध्यक्ष सुनील पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.
नायकवाडे म्हणाले कि, पुढील पिढी घडविणे जिकरीचे ठरणार आहे. अशा व्याख्यानमालेतून राष्ट्रपुरुषांच्या विचारांचा जागर होणे गरजेचे आहे. स्वामीजींना अभिप्रेत असा युवक घडणीसाठी हे प्रतिष्ठान अविरतपणे कार्य सुरु ठेवून विचारांचा खजिना खुला केला आहे. हे कौतुकास्पद बाब आहे. स्वामीजींचे स्वप्न साकार करण्याठी युवकांनी व्याख्यानमालेला हजर राहून त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत.
काळे म्हणाले कि,स्वामीजी तेजोमय जीवन जगले.निस्वार्थ पणे प्रतिष्ठानने स्वामीचे कार्य सुरु ठेवले.हे विशेष बाब आहे.
गेली २२वर्षापासून अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून विवेकानंदांचे विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी प्रतिष्ठान प्रयत्न करीत असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामराजे बेंबडे यांनी दिली.
कार्यक्रम आयोजनासाठी मिलिंद वेल्हाळ, महेश मांडवकर,श्रेणिक पंडित, संतोष ठाकूर, शंकरराव बनकर, मोहन सावरे, दिलीप मांडवकर,यांनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन दत्ता पोतदार यांनी तर आभार देविदास आढलिंग यांनी मानले.