मराठी मनोरंजन सृष्टीतील कंपुशाहीबाबत नागराज मंजुळेंचं वक्तव्य चर्चेत

मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळे मनोरंजन सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. समाजातील विविध गोष्टींवर आपलं मत समाजमाध्यमातून व्यक्त करत असतात. आत्तापर्यंत मराठी इंडस्ट्रीतील अनेक गोष्टींबद्दल भाष्य केलं आहे. आता मराठी मनोरंजन सृष्टीतील कंपुशाहीबाबत त्यांनी त्यांचं मत मांडलं आहे.
नागराज मंजुळे यांना मराठी मनोरंजन सृष्टीत कंपुशाही आहे का? किंवा कम्फर्ट झोनसाठी ठराविक कलाकारांबरोबरच काम केलं जातं असं होतं का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, तेजस्विनीच्या मताशी मी सहमत आहे. कम्फर्ट झोन सगळीकडे असतो. तेजस्विनी आणि संजय जाधव मुद्दाम एकत्र काम करतात असं नाही. त्यांनी काम करण्यास सुरूवात केली आणि त्यांच्यात चांगली मैत्री झाली.
आता माझ्या गावाकडेच माझे मित्र हे अजुनही माझे चांगले मित्र आहेत. बळजबरीने मी अमेरिकेत जाऊन एखाद्याशी मैत्री करू शकत नाही. पण असंही नाही की या लोकांशिवाय काही काम करायचंच नाही. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीत कंपुशाही आहे असं मला वाटत नाही, असं नागराज मंजुळे म्हणाले.
नागराज मंजुळे सध्या त्यांच्या आगामी ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत.





