शालेय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयातील मुलांच्या संघाला 05 वेळा विजेतेपद

पुणे :अनुभूती इंटरनॅशनल स्कूल मैदान, जळगाव येथे दिनांक 01 ते 04 नोव्हेंबर 2026 या कालावधीत झालेल्या शालेय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयातील 17 वर्षाखालील मुलांच्या संघाने पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करत अंतिम सामन्यात लातूर विभागाचे दहा ओव्हर मध्ये 67 धावांचे आव्हान देण्यात आले त्याला प्रत्युत्तर देताना राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालय मुलांच्या संघाने 1 ओव्हर राखुन हे आव्हान सहज पूर्ण केले. त्यामुळे पाचव्यांदा विजेतेपद मिळविले.
या विजयात आयुष गुप्ता याने नाबाद 34 धावा केल्या व समर्थ पवार, दर्शीत पाटील यांनी संघाच्या धावसंख्या वाढवण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.तसेच गोलंदाज पार्थ सोनवणे याने दोन ओव्हर मध्ये 02 गडी बाद केले व रुद्र पाटील ,ओंकार गुरुनावर, रमण महाडिक यांनी दोन ओव्हर मध्ये प्रत्येकी 01 गडी बाद करत या सर्व खेळाडूंनीसंघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यापूर्वी झालेल्या उपांत्य फेरीत नागपूर विभागाच्या संघाला पुणे विभागाच्या राजमाता जिजाऊ संघाने 10 ओव्हर मध्ये 130 धावांचे आव्हान देण्यात आले होते परंतु नागपूर विभागाचा संघ 10 ओव्हर मध्ये 96 धावाच करू शकला त्यामुळे राजमाता जिजाऊ संघाने विजय मिळून अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश केला.
हेही वाचा – अग्निवीर योजनेत मोठा बदल? २५ टक्क्यांऐवजी ७५ टक्के जवानांना सैन्यात संधी; केंद्राच्या निर्णयाची चर्चा
या शालेय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर, अमरावती, लातूर, नागपूर या आठ विभागातील संघ सहभागी झालेले होते. त्यात राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयातील मुलांच्या संघाने पुणे विभागाच्या प्रतिनिधित्व करत प्रथम क्रमांक मिळविला या विजयी संघात रुद्र पाटील(कर्णधार), समर्थ पवार, पार्थ सोनवणे रमण महाडिक, दर्शित पाटील, देव प्रधान, अर्णव डेरे, आर्यन गोपाळे, दृष्टांतराजे पिंगळे, ओंकार गुरूनावर, भव्य ओसवाल, अर्णव डेरे, मिथुन चव्हाण, आयुष गुप्ता आरुष सिंग, प्रज्वलमोरे,या खेळाडूंचा समावेश होता. या सर्व खेळाडूंना कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे व प्रशिक्षक श्री.दत्तात्रेय वाळके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व भोसरी चे प्रथम आमदार मा.श्री. विलासराव लांडे साहेब यांनी विशेष अभिनंदन करून खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे खजिनदार व पिं.चिं.मनपा स्थायी समिती मा.अध्यक्ष श्री अजित भाऊ गव्हाणे, संस्थेचे सचिव श्री सुधीरभाऊ मुंगसे सर,पिं.चिं. मनपाचे नगरसेवक व संस्थेचे विश्वस्त विक्रांतदादा लांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कानडे के.जी , उपप्राचार्य प्रा.किरण चौधरी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.नेहा बोरसे, रजिस्ट्रार सौ.अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा.योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.




