शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणी सुरू
पुण्यातील रूबी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार यांना पुढील तपासणीसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात पुढील तपासणीसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना कफाचा त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील रूबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार घेतल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर आता त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा – नाशिक महापालिकेत भाजपचे ६ स्वीकृत नगरसेवक जाहीर; रोहिणी नायडू एकमेव महिला प्रतिनिधी
सुप्रिया सुळे यांच्याकडून माहिती
खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून शरद पवार यांच्या रुग्णालयात दाखल होण्याबाबत माहिती दिली. शरद पवार यांना पुढील वैद्यकीय तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय माहिती किंवा तपासणीचे निष्कर्ष अद्याप समोर आलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. पुढील अधिकृत माहितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




