Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणे
Unseasonal rain: पुणे-पिंपरी-चिंचवड परिसरात मुसळधार अवकाळी पावसाची हजेरी!
पुण्यातील राजकीय सभा रद्द होण्याची शक्यता : लोकसभा निवडणूक प्रचाराला पावसाचा अडथळा
पुणे । प्रतिनिधी
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना काही दिलासा मिळाला असला, तरी नागरिक, वाहनचालकांची चांगलीच धावपळ झाली.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, मनसे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पुण्यात सभा नियोजित आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड- भोसरीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दुचाकी रॅली नियोजित आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे राजकीय सभा आणि प्रचार रॅली रद्द होतील, असे सांगितले जात आहे.





