पिंपरी / चिंचवड

वाहनाखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपरी l प्रतिनीधी

भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेले. त्याखाली चेंगरून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 16) मध्यरात्री विशालनगर, वाकड येथे घडली.

शेखर महादेव गव्हाणे (वय 48) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ शंतनु महादेव गव्हाणे (वय 51, रा. धनकवडी, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चारचाकी वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंतनू यांचा भाऊ शेखर हे (एमएच 14 बीडी 3418) दुचाकीवरून चालले होते. ते गुरुवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास वाय जंक्‍शन जवळील विशालनगर वाकड येथे आले असता त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात यांच्या डोक्‍यावरून अज्ञात वाहनाचे चाक गेले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button