पिंपरी, चिंचवडमध्ये दोन घरफोड्या
![He broke the lock and stole jewelery worth ten lakh rupees](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/ROBBERY-1.jpg)
पिंपरी चिंचवड | पिंपरी आणि चिंचवड परिसरात घरफोडीच्या दोन घटना घडल्या. यातील एका घटनेत 54 हजारांचे दागिने तर दुसऱ्या घटनेत 8 हजार 700 रुपयांची तांब्याची भांडी आणि स्टीलच्या बाटल्या चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी रविवारी (दि. 22) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.मयूर भानुदास नारखेडे (वय 33, रा. वाल्हेकरवाडी रोड, गुरुद्वारा चौक, चिंचवड) यांनी पहिल्या प्रकरणात चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे घर कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातून 54 हजार रुपयांचे सोन्याचे 11.9 ग्रॅम वजनाचे दागिने घरफोडी करून चोरून नेले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत रमेश शंकरराव वाघ (वय 74, रा. वाकड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना उद्यमनगर पिंपरी येथे 31 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत घडली. अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातून आठ हजार 700 रुपये किमतीची तांब्याची भांडी व स्टीलच्या दोन बाटल्या चोरून नेल्या. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.