breaking-newsपिंपरी / चिंचवड

दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना अयोध्येतील राम मंदिराजवळ आदरांजली!

रामलल्लांचे दर्शन: मोदी २.० ग्रुप आणि मिशन डेव्हलप भारत ग्रुपच्या सदस्यांचा दौरा

पिंपरी : अयोध्येतील रामजन्मभूमीत ५०० वर्षानंतर भव्य राम मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. या मदिरांत जाऊन रामलल्लाचे दर्शन देशभरातील हिंदू भाविक सध्या घेत आहेत, पिंपळे सौदागर येथील मोदी २.० ग्रुप आणि मिशन डेव्हलप भारत ग्रुपच्या सदस्यांनीही अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. दर्शनानंतर या सदस्यांनी पिंपरी-चिंचवडचे लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना राम मंदिराजवळ आदरांजली वाहिली. दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी हिंदू धर्माविषयी केलेल्या कार्याबद्दल या सर्वांनी आदर व्यक्त केला.

अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरात रामलल्ला मूर्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या महिन्यात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी देशभरातील लाखो हिंदू भाविक अयोध्येत जात आहेत. पिंपरी-चिंचवडमधीलही शेकडो रामभक्त अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेत आहेत. पिंपळेसौदागर येथील मोदी २.० ग्रुप आणि मिशन डेव्हलप भारत ग्रुपच्या सदस्यांनी अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. दर्शनानंतर सर्व सदस्यांनी पिंपरी-चिंचवडचे लोकनेते दिवंगत आमगार लक्ष्मणभाऊ जगताप यांना राम मंदिराजवळ आदरांजली वाहिली. दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप हे पिंपरी-चिंचवडचे लोकनेते होते. त्यांनी या शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. नगरसेवक, महापौर, आमदार या पदांवर काम करताना दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.

लक्ष्मणभाऊंच्या हिंदूत्वाबद्दल व्यक्त केला आदर…

दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी केवळ शहराचा विकासच नाही, तर हिंदू धर्मासाठी देखील अनेक कामे केली आहेत. श्री श्री रविशंकर, वामनराव पै, बाबा रामदेव यांचे पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच कार्यक्रम आयोजित केले व राममंदिर निधी संकलन अभियानामधे देखील महत्वाची भुमिका बजावली होती. त्याचप्रमाणे इतर काही हिंदू साधुसंतांचे कार्यक्रण घेऊन दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी हिंदुत्व जोपासले होते. त्यांच्या या हिंदुत्ववादी कार्याविषयी आदर व्यक्त करण्याच्या उद्देशाने पिंपळेसौदागर येथील मोदी २.० ग्रुप आणि मिशल डेव्हलप भारत ग्रुपच्या सदस्यांनी अयोध्येतील राम मंदिराजवळ त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी संकेत कुटे, दिलीप राठी, चैतन्य पाटील, विनोद राठी, घनशाम निषाद, विवेक फडणीस, अजित देशमुख, पुनम राजपुत,ईश्वर मुठा,आकाश जोडगुद्री, प्रणय गोस्वामी, राकेश खत्री, सुदीप राजन व पिंपळे सौदागर-रहाटणी भागातील इतर रामभक्त उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button