पिंपरी चिंचवड शहरात वाहन चोरीच्या तीन घटना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/PCMC-crime-Vehicle-theft-incidents-of-six-twowheelers-in-one-day-case-registered-at-police-station.png)
केदार भारतआप्पा शेरकर (वय 22, रा. निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी 3 जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता त्यांची 30 हजार रुपये किमतीची दुचाकी पवळे उड्डाणपुलाजवळ टिळक चौकात पार्क केली होती. दिवसभराच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
योगेश रामदास पायगुडे (वय 40, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची दुचाकी त्यांच्या घरासमोर रस्त्यावर पार्क केली. तिथून चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली.
धीरज तानाजी माने (वय 25, रा. न-हे रोड, धायरी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी 31 डिसेंबर रोजी बावधन येथील चेलाराम हॉस्पिटलसमोर पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. दोन्ही गुन्ह्यांचा तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.