Uncategorized

प्लास्टिक वेल्डिंग मशीन, वेल्डिंग गन चोरी प्रकरणी दुकानातील कामगारावर गुन्हा

पिंपरी l प्रतिनिधी

दुकानात काम करणा-या कामगाराने दुकानातील हजारो रुपये किमतीच्या मशीन चोरून नेल्या. ही घटना बुधवारी (दि. 5) सकाळी एमआयडीसी भोसरी मधील श्री इंटरप्रायजेस या कंपनीत घडली.

पारस शर्मा (वय 40, रा. चोटीया, प्यासी, सलेमपूर, जि. देवोरीय, उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी श्रीमंत ज्ञानदेव बोबडे (वय 36, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे एमआयडीसी भोसरी येथे श्री इंटरप्रायजेस नावाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात पारस शर्मा काम करत होता. त्याने बुधवारी सकाळी पावणे सात वाजता फिर्यादी यांच्या दुकानातून प्लास्टिक वेल्डिंग मशीन, प्लॅनर मशीन, जेक्सो मशीन, प्लास्टिक वेल्डिंग गन, 1600 वॅट पॉवरची प्लास्टिक वेल्डिंग मशीन असा एकूण 49 हजार 600 रुपये किमतीच्या मशीन चोरून नेल्या. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button