PCMC | सुधारित विकास आराखड्याला थेरगाववासीयांचा विरोध!
आमदार शंकर जगताप यांना निवेदन: अनावश्यक आरक्षण टाकल्यामुळे भूमिपुत्रांसह स्थानिकांवर अन्याय

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने नवीन प्रस्तावित प्रारूप विकास आराखडा मंजूर केलेला आहे .यामध्ये थेरगावमधील समस्या खूपच बिकट व संभ्रम निर्माण करणारी झालेली आहे. या विकास आराखड्यामध्ये 24 मीटर, 15 मीटर, 12 मीटर, 9 मीटर याचबरोबर रिंग रोड , उद्याने शाळा अशी अनेक आरक्षणे आहेत. यामध्ये थेरगाव मधील भूमिपुत्र शेतकरी ,रहिवासी ,व्यापार वर्ग या सर्वांचेच कंबरडे मोडून टाकणारा हा प्रारप विकास आराखडा आहे.
याच अनुषंगाने चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांना थेरगावमधील सर्वसामान्य नागरिकांनी सभेसाठी आमंत्रित केलेले होते. थेरगावमधील न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ही सभा आयोजित केलेली होती. या ठिकाणी नागरिक व महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवड भाजपा महिला मोर्चाच्यावतीने तृतीयपंथी डॉ. आम्रपाली मोहिते यांच्या कार्याचा गौरव!
या कार्यक्रमासाठी स्थानिक नगरसेवक काळूराम बारणे, अभिषेक बारणे, तानाजी बारणे, मनीषा पवार, संतोष बारणे, मनोहर पवार, शुभम नखाते, संतोष बारणे, संदीप गाडे, न्यू इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष विजय पवार, अशोक मोरे तसेच स्थानिक नागरिक नरेंद्र माने, हरीश पाठक, प्रताप डुंबरे, अक्षय कांबळे, विजय माने, दीपक तरडे, यशवंत माने, रुपेश गोरे, अक्षय पाटील महिलांनी आपली व्यथा व मनोगत व्यक्त केले.
थेरगावमधील एकही घर पाडू देणार नाही : आमदार जगताप
स्थानिक नगरसेवकांनी आमदार साहेबांसमोर विकास आराखडा रद्द करावा .कारण थेरगाव मध्ये विकासाच्या बाबतीत भरपूर सुविधा आहेत तसेच स्थानिक नगरसेवक हा निर्धार केला आहे थेरगाव मधील एकही बांधकाम पाडले तर आम्ही निवडणूक लढवणार नाही. या सर्वांच्या मागणी व व्यथा ऐकून आमदार साहेबांनी नागरिकांना मार्गदर्शन केले जास्तीत जास्त नागरिकांनी हरकती फॉर्म भरून महानगरपालिका ऑफिसमध्ये जमा करण्यास सांगितले व सर्व नागरिकांना आश्वासन दिले आहे थेरगाव मधील एकही घर पडून देणार नाही व इथून पुढे सर्वांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्याचे सुद्धा आश्वासन दिले आहे.