पिंपरी / चिंचवड

चाळीत आल्याचा जाब विचारल्याने महिलेने केला तरुणावर कोयत्याने वार

पिंपरी l प्रतिनिधी

रस्त्यावरील भांडणानंतर आरोपी चाळीत आले. याबाबत एका तरुणीने विचारणा केली. या कारणावरून एका महिलेने जाब विचारणा-या तरुणीच्या भावावर कोयत्याने वार केले. ही घटना मंगळवारी (दि. 19) रात्री ओटास्कीम, निगडी येथे घडली.

योगेश शरद निर्मल (वय 19, रा. आझाद चौक, ओटास्कीम, निगडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी बुधवारी (दि. 20) याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोनी घाटे, कान्हा घाटे, बाबा धोत्रे, अमोल कुसाळकर (सर्व रा. ओटास्कीम, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांचे ओटास्कीम, निगडी येथे भांडण चालले होते. त्यावेळी फिर्यादी योगेश हे आपल्या आई आणि बहिणीला घेऊन घरी चालले होते. योगेश हे आपल्या चाळीत आल्यावर आरोपीही तिथे आले. त्यावेळी फिर्यादी योगेश यांची बहिण आरोपींना म्हणाली की, ‘आमच्या चाळीत तुमचे काय काम आहे’. यावरून संतापलेल्या आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या बहिणीस शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. तसेच महिला आरोपी सोनी हिने फिर्यादी योगेश यांच्या कपाळावर कोयत्याने वार केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button