वारं फिरलं तुषार सहानेंना नागरिकांची पसंती
प्रभाग 8 जय गणेश साम्राज्य केंद्रीय विवाह परिसरात राष्ट्रवादी उमेदवारांना प्रतिसाद

इंद्रायणी नगरची सुसंस्कृत ओळख पुन्हा मिळवणार; आरोग्य कार्डाच्या माध्यमातून ज्येष्ठांच्या आरोग्याची घेणार जबाबदारी
पिंपरी-चिंचवड: भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तुषार सहाणे यांच्या प्रचाराने वेग घेतला असून, जय गणेश साम्राज्य आणि केंद्रीय विहार परिसरात त्यांना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. “प्रभागात आता परिवर्तनाचे वारे वाहत असून, तुषार सहाणे यांचा विजय निश्चित आहे,” असा विश्वास स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

महिला आणि ज्येष्ठांचा मोठा सहभाग
प्रचारादरम्यान महिलांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा सकारात्मक प्रभाव महिलावर्गावर दिसून येत असून, राष्ट्रवादीच्या पॅनेलला पसंती मिळत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी तुषार सहाणे यांनी जाहीर केलेल्या ‘आरोग्य सहाय्य कार्ड’ संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ज्येष्ठांसाठी खास आरोग्य आणि सुविधांचा संकल्प
निवडून आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी तुषार सहाणे यांनी महत्त्वाची आश्वासने दिली आहेत:
आरोग्य कार्ड: प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला विशेष आरोग्य कार्ड दिले जाईल.
मोफत तपासणी: वर्षातून दोन वेळा संपूर्ण शरीराची मोफत आरोग्य तपासणी.
भक्ती आणि मनोरंजन: दरवर्षी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत देवदर्शन सहल आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन.
सामाजिक उपक्रम: ज्येष्ठांच्या सक्रियतेसाठी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची आखणी.
हेही वाचा – वाकड गावठाणातून विजयाचा संकल्प : भाजपा पॅनलची भव्य पदयात्रा!

गुंडगिरीमुक्त इंद्रायणी नगरचे आश्वासन
यावेळी बोलताना तुषार सहाणे म्हणाले की, “गेल्या काही काळात इंद्रायणी भागात गुंडगिरीचे प्रमाण वाढले आहे. अनधिकृत बांधकामे आणि टपऱ्यांचा विळखा वाढला आहे. हे सर्व थांबवून इंद्रायणी नगरची पूर्वीची शांत आणि सुसंस्कृत ओळख पुन्हा मिळवून देणे हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे. विकासकामांसोबतच नागरिकांची सुरक्षा आणि आरोग्य ही माझी प्राथमिकता असेल.”
प्रभाग ८ मधील वाढता जनसंपर्क आणि मिळणारा प्रतिसाद पाहता, राष्ट्रवादी काँग्रेसचे पूर्ण पॅनल विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.




