Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा ६४ टक्क्यांवर!

शहरात मागील साडेपाच वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा

पिंपरी- चिंचवड : मागील ८ ते १० दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला असून, मावळ तालुक्यातील पवना धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. धरणातील पाणीसाठा ६३.९२ टक्क्यांवर आला आहे.

दुसरीकडे, पिंपरी-चिंचवड शहराला मागील साडेपाच वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या वाढत असल्यामुळे पाण्याची मागणीही सातत्याने वाढू लागली आहे. सद्यःस्थितीत शहराला मावळातील पवना धरणातून ५१०, आंद्रा धरणातून ८०, एमआयडीसीकडून २० असे ६१० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच भविष्याचा विचार करून महापालिकेच्या वतीने भामा आसखेड धरणातून १६७ एमएलडी पाणी आणण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या कामाला वेग आला असून डिसेंबर२०२५ अखेर या जलवाहिनीचे काम पूर्ण करण्याचा मानस महापालिका प्रशासनाचा आहे.

पवना धरणात ६३.९४ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी आजअखेर धरणात ६२.९१ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा गतवर्षापेक्षा १.३ इतका अधिक पाणीसाठा धरणात शिल्लक असून तो १५ जुलैअखेर पुरेल. असे असले तरी शहरवासीयांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पवना धरणाचे शाखा अभियंता रजनीश बारिया यांनी केले आहे.

हेही वाचा –  रा. स्व. संघ जनकल्याण समिती’तर्फे आरोग्यविषयक जागृती मोहीम

५ फेब्रुवारी अखेरपर्यंत पवना धरणातील पाणीसाठा

वर्ष      साठा (टक्के)

■ २०२१     ७१.२१,

■ २०२२    ६३.६७,

■ २०२३     ६३.१६,

■ २०२४     ६२.९१,

■ २०२५     ६३.९२.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button