Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘वाघेरे कुटुंबाकडे संस्काराचा वारसा’; विलास लांडे

दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे-पाटील स्मृतीदिन कार्यक्रम

हभप दत्तात्रय कुदळे यांना पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार प्रदान

पिंपरी चिंचवड :  पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत दिवगंत महापौर कै. भिकू वाघेरे-पाटील यांच्या महत्वाचा वाटा आहे. दिवंगत भिकू वाघेरे पाटील हे पिंपरी वाघेरे गावचे माजी सरपंच होते. आणि ते एक आदर्श व्यक्तीमत्व होते, त्यामुळे त्याच्या संस्काराचा वारसा पुढे असाच सुरु ठेऊन त्याच्या आठवणी जाग्या कराव्यात, हीच त्यांना खरी आदरांजली असेल, असे प्रतिपादन माजी आमदार विलास लांडे यांनी केले. दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या 39 व्या स्मृतीदिनानिमित्त ते बोलत होते.

कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी आमदार विलास लांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी कार्यक्रमास आमदार महेश लांडगे, माजी आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, संयोजक माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील, सुमनताई पवळे, माई काटे, उषाताई संजोग वाघेरे-पाटील, माजी नगरसेवक नाना काटे, राजू मिसाळ, डब्बू आसवाणी, निकिता कदम, रंगनाथ कुदळे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, दत्तात्रय वाघेरे, संतोष कुदळे, नरहरी कापसे, सल्लागार अण्णा कापसे, सचिव बाळासाहेब वाघेरे, खजिनदार किसन वाघेरे, रमेश गोलांडे, बिपीन नाणेकर, अंकुश वाघेरे, जयवंत शिंदे, संतोष वाघेरे तसेच कार्यक्रमाचे संयोजन दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठान व पिंपरी वाघेरे ग्रामस्थांनी केले.

हेही वाचा –  बकरी ईद निमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल, ‘हे’ रस्ते बंद, वाचा पर्यायी मार्ग

दरम्यान, पिंपरी-चिंचवड समाज भूषण पुरस्कार हभप दत्तात्रय कुदळे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील म्हणाले की, माजी दिवगंत महापौर कै. भिकू वाघेरे-पाटील प्रतिष्ठानच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाते. तसेच विविध स्पर्धाचे आयोजन करून महिला सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण शिबिराचे राबवली जातात. प्रतिष्ठानचे सचिव योगेश कोंढाळकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले आणि आभार मानले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button