Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नियोजनबद्ध कामकाज, काटेकोर अंमलबजावणी आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयांमुळे मालमत्ता कर संकलनात वाढ : महापौर रवि लांडगे

कर संकलन मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १८ विभागीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा करण्यात आला सन्मान

पिंपरी-चिंचवड: नियोजनबद्ध कामकाज, काटेकोर अंमलबजावणी आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयांमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता कर संकलनात उल्लेखनीय वाढ झाली आहे,या यशामागे करसंकलन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अविरत श्रमदान आणि जबाबदारीने केलेले काम महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व करसंकलन विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२५–२६ मध्ये मालमत्ता कर संकलन मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १८ विभागीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ तसेच आगामी आर्थिक वर्ष २०२६–२७ साठी मालमत्ता कर बिल वाटप मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महिला बचत गटांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात करण्यात आले होते. यावेळी महापौर रवि लांडगे बोलत होते.

उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी माई पठारे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नगरसदस्या सुलभा उबाळे,निकिता कदम, सारिका मासुळकर, नीता पाडळे यांच्यासह महापालिका उपायुक्त सचिन पवार,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह करसंकलन विभागातील अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गटाच्या महिला सदस्या आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त सचिन पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

हेही वाचा –  PCMC: मोठ्या प्रकल्पांपेक्षा मूलभूत सुविधा सोडविण्यावर भर द्या!

१८ विभागीय कार्यालयांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

कर आकारणी व करसंकलन विभागामार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात मालमत्ता कर संकलन मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १८ विभागीय कार्यालयांसह संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या अंतर्गत निगडी, आकुर्डी, चिंचवड, थेरगाव, सांगवी, पिंपरी-वाघेरे, पिंपरी नगर, मनपा भवन, फुगेवाडी-दापोडी, भोसरी, चऱ्होली, मोशी, चिखली, तळवडे, किवळे, दिघी-बोपखेल, वाकड व कस्पटेवस्ती या विभागीय कार्यालयांतील सर्व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच करसंकलन विभागातील प्रशासन अधिकारी सुचेता कुलकर्णी, रश्मी देशपांडे, संजय तळपाडे, जयवंत निरगुडे तसेच जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय मे. फॉक्सबेरी टेक्नॉलॉजीज प्रा. लि., मे. टेक नाईन प्रा. लि. आणि मे. स्थापत्य कन्सल्टंट प्रा. लि. यांच्या कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला.

‘सिद्धी’ अ‍ॅपचे प्रशिक्षण; ६०० हून अधिक महिलांचा सहभाग

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभाग आणि टाटा स्ट्राईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘सक्षम’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गट फेडरेशनच्या ६०० हून अधिक महिलांना मालमत्ता कर बिल वाटप प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये ‘सिद्धी’ अ‍ॅपच्या माध्यमातून मालमत्ताधारकांना घरपोच बिल कशाप्रकारे वाटप करायचे, याची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच नवी मालमत्ता सर्वेक्षण प्रक्रिया आणि ‘गो ग्रीन’ उपक्रमांतर्गत ई-बिल वाटपाबाबतही महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. सीएचडीसी प्रकल्पातील कर्मचारी रोहिणी कदम यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह महिलांना प्रशिक्षण दिले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button