TOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवडपुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अखेरचा 122 वा पदवी प्रदान समारंभ येत्या 1 जुलै रोजी होणार
![Savitribai Phule, Pune University, last 122nd, graduation ceremony, on 1st July,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/savitribai-fule-vidhyapith-Pune-780x470.jpg)
पुणेः
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 122 वा पदवी प्रदान समारंभ येत्या 1 जुलै रोजी दुपारी विद्यापीठात होणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षांपासून राज्यातील विद्यापीठाचे जाहीर पदवीदान समारंभ बंद करण्याचे निर्देश उच्च शिक्षण संचालनालयानं यापूर्वीच दिले असल्यानं यंदाचा विद्यापीठाचा हा अखेरचा जाहीर पदवी प्रदान समारंभ ठरणार आहे. यंदाच्या वर्षी एकंदर 1 लाख 21 हजार 281 विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून विविध विद्या शाखांची पदवी प्रदान केली जाणार आहे.