गोर बंजारा समाजाची रूढी-परंपरा- संस्कृती टिकवण्यासाठी पुणे टीमचे मोठे कार्य सुरू – ॲड. पंडित राठोड
"गोर बंजारा तिज उत्सव" कार्यक्रम उत्साहात : राहुल कलाटे यांची उपस्थिती
![The Gor Banjara Tij festival program is full of excitement](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/PCMC-5-780x470.jpg)
पिंपरी : वाकड येथे राष्ट्रीय बंजारा परिषद पुणे जिल्हा आयोजित तिज उत्सव कार्यक्रम ७ सप्टेंबर रोजी वाकड येथे उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य व गोर बंजारा समाजाचे कार्यक्षम नेते ॲड. पंडित राठोड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका माजी नगरसेवक राहुल कलाटे, पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व डॉ. कुणाल जाधव, नामवंत उद्योगपती प्रदीप कदम, यशदाचे प्रमुख, गिनीज बुक रेकॉर्डर हिपनोटाईस तज्ज्ञ नवनाथ गायकवाड यांची विशेष उपस्थिती व राष्ट्रीय बंजारा परिषद चे पुणे जिल्हा संघटक व नायक प्रेमकिसन राठोड यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रीय बंजारा परिषद युवा नेते अमोल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हात भव्य गोर बंजारा तिज उत्सव कार्यक्रम उत्साहात मान्यवरांच्या हस्ते पूजन, तिज तोडणी करून मान्यवरांचे पदाधिकारी यांचे भव्य सत्कार करण्यात आला.
ॲड. पंडितभाऊ राठोड यांनी समाज बांधवांना संबोधित करताना समाजाचा विकास करण्यासाठी मी भाजपाच्या माध्यमातून कटिबद्ध आहे. समाजाची रूढी परंपरा संस्कृती टिकवण्यासाठी पुणे टीमचे कार्य कौतुकास्पद असून पुणे टीमच्या कार्याची विशेष भाऊंनी कौतुक केलं. गोर बंजारा तिज उत्सव डफडा नाचत गात संस्कृती प्रमाणे भव्य रॅली काढून तिज विसर्जन करून यशस्वी रित्या कार्यक्रम संपन्न झाले.
हेही वाचा – कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सपना राठोड, भाग्यश्री राठोड-जाधव, नायकंन अर्चना राठोड, वर्षा पवार, डॉ.विनीत राठोड साहेब, दौंड तालुक्यातील सरपंच युवा नेते विकास राठोड, युवा नेते मिथुन राठोड, राजेभाऊ राठोड, संतोष जाधव, प्रेम कुमार जाधव, गोवर्धन राठोड, गोर बंजारा तिज उत्सव समितीचे सदस्य प्रल्हाद राठोड, सुबोध पवार, जयसिंग राठोड, कैलास चव्हाण, स्वप्नील चव्हाण, नितीन पवार, सोपंन जाधव, दिनेश पवार, राजेश चव्हाण, सुनील आडे, मनोहर राठोड, विजयसिंह राठोड, सुनीता राठोड, कैलास चव्हाण यांच्या सह राष्ट्रीय बंजारा परिषदचे पदाधिकारी समाज बंधू भगिनींनी लहान थोर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आलेल्या सर्व मान्यवरांचे व समाज बंधू भगिनींनीचे पदाधिकारी यांचे नायक प्रेमकिसन राठोड यांनी मनःपुर्वक आभार मानले.