Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

भावी मुख्यमंत्री बॅनरवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, जयंत पाटील आणि सुप्रिया..

पुणे : अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत इच्छा व्यक्त केली होती. यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. दरम्यान, पुण्यात अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे. यावरून अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात बोलत होते.

अजित पवार म्हणाले, अलिकडे आपल्या महाराष्ट्रात एक नवीन फॅड निघालं आहे. अनेक ठिकाणी अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असे बॅनर लावत असतात. माझ्या कानावर आलंय की, माझेही असे मुख्यमंत्रीपदाबाबत बॅनर लागले आहेत. राज्यात काही ठिकाणी राज ठाकरेंचे बॅनर लागलेत. काही ठिकाणी धनंजय मुंडेंच्या बहीण पंकजा मुंडेंचेही बॅनर लागले.

हेही वाचा – “गोर बंजारा तिज उत्सव” कार्यक्रम उत्साहात संपन्न

कार्यकर्त्यांचा उत्साह असतो. मागे मुंबईला राष्ट्रवादी भवनाच्या बाहेर माझे, जयंत पाटलांचे आणि सुप्रिया सुळे असे तिघांचे बॅनर लागले. हे काही आम्ही कुणी सांगत नाही. मी त्यांना नेहमी सांगतो की, असं कुणी बॅनरवर भावी मुख्यमंत्री, भावी पालकमंत्री लिहून सांगितल्याने तसं होत नाही. कुणाला मुख्यमंत्री व्हायचं असेल, तर १४५ आमदारांचा ‘जादुई आकडा’ गाठावा लागतो. ज्याला १४५ आमदारांचा पाठिंबा मिळेल तो मुख्यमंत्री होत असतो. मागे उद्धव ठाकरेंनी गाठला, देवेंद्र फडणवीसांनी गाठला आणि आत्ता एकनाथ शिंदेंनी हा आकडा गाठला आणि मुख्यमंत्री झाले, असंही अजित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button