Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
दिव्यांग विद्यार्थ्यांनी साजरी केली “सूर्यनमस्कार” घालून रथसप्तमी
वाकड येथील "ऊर्जा" दिव्यांग शाळेचा आदर्शवत उपक्रम

पिंपरी | माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्य देवताची पूजा, उपासना केली जाते. हा दिवस सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो या दिवसाचे औचित्य साधून अभिसार फाउंडेशन वाकड येथील “ऊर्जा” दिव्यांग मुलांची शाळा व कार्यशाळा येथील ऑटिझम विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सूर्यनमस्कार घालून सूर्याला नमन केले.

हेही वाचा – ‘नाना पटोलेंचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा ही तर सर्वात मोठी घोडचूक’; अशोक चव्हाण यांचं विधान

स्वयंप्रकाशी, तेजस्वी, सामर्थ्यवान, युक्तिमान, सृष्टीचा निर्मिता असणाया अशा सूर्य देवताची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सूर्यनमस्कार घालून स्वमग्न (ऑटिझम) विद्यार्थ्यांनी रथसप्तमीचा सण साजरा केला. या कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा शिक्षक विकास जगताप व ऋषिकेश मुसुडगे यांनी केले होते.





