पारंपरिक वेशभूषेतून विद्यार्थ्यांची शिवरायांना मानवंदना!
शिक्षण विश्व: गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

पिंपरी-चिंचवड : नृत्य, नाटिका, पोवाडा तसेच पारंपारिक वेशभूषा परिधान करत भोसरीतील गायत्री इंग्रजी मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी श्री.छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त मानवंदना दिली. यावेळी शाळेतील वातावरण अगदी भारावून गेले होते
गायत्री इंग्लिश मिडीयम स्कूल येथे बुधवारी सकाळी संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. यावेळी संस्था अध्यक्ष विनायक भोंगळे , व्यवस्थापकीय संचालिका कविता कडू पाटील, विश्वस्त सरिता विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली भागवत, सर्व मुख्याध्यापक-उपमुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
हेही वाचा – पुण्यात अवतरली शिवशाही : शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून भव्यदिव्य मानवंदना
कविता कडू पाटील यावेळी म्हणाल्या छत्रपती शिवराय म्हणजे राजासारखे मन असलेले रयतेच्या मनासारखे राजे होय. शिवराय म्हणजेच सळसळत्या रक्तात वाहणारा अखंड शौर्याचा स्त्रोत. शिवबा, रयतेचे राजे, जाणता राजा हे शब्द आज साडेतीनशे वर्षांनंतरही कानी पडताच उर अभिमानाने फुलून येतो व देही स्फुरण चढल्याशिवाय राहत नाही. शिवजयंती निमित्त शाळेतील विद्यार्थी पारंपारिक वेशभूषा करून कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवरायांवर रचलेले पोवाडे, कविता, नृत्ये व नाटके सादर केली.