Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती तातडीने थांबवा अन्यथा आंदोलन!

चिखली- मोशी- पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचा इशारा

पिंपरी | पिंपरी चिंचवड शहरातील सहकारी गृहरचना संस्थांमध्ये ( सोसायट्यांमध्ये) जुन्या कंपनीचे मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्याचे काम थांबवण्याची मागणी चिखली- मोशी- पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या करण्यात आली आहे.

याबाबत फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी महावितरणला निवेदन दिले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, महावितरण कंपनीकडून प्रत्येक सहकारी गृह रचना संस्थेमध्ये असणाऱ्या सदनिकाधारकांचे जुने मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचे काम चालू आहे. परंतु नवीन बसवलेल्या स्मार्ट मीटरने विजेचे बिल आवाच्या सव्वा येत आहे. नेहमीच्या वापरापेक्षा स्मार्ट मीटर मुळे येणारे वीज बिल अवास्तव आहे. त्यामुळे या नवीन स्मार्ट मीटरच्या विश्वसार्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.

हेही वाचा    :    ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा; चंद्रकांत पाटील 

गृहनिर्माण संस्थांमध्ये महावितरण कंपनीकडून जबरदस्तीने, बळजबरीने मीटर बदलून घेण्याची मोहीम चालू आहे. यामुळे सोसायटीधारकांच्या खिशावर एक प्रकारे डल्ला मारण्याचे काम महावितरण कडून केले जात आहे. महावितरण कडून होणारा हा हिटलर शाही कारभार तातडीने थांबवण्यात यावा. बळजबरीने ही मोहीम रेटून नेण्याचा प्रकार चालू ठेवल्यास फेडरेशनतर्फे तीव्र विरोध केला जाईल असेही संजीवन सांगळे यांनी म्हटले आहे.

स्मार्ट मीटरच्या नावाखाली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने एका खाजगी कंपनीचे मीटर घेऊन जून मीटर बदलून घेण्याची मोहीम चालवली आहे. त्याला फेडरेशनचा पूर्णपणे विरोध आहे. हे स्मार्ट मीटर बदलल्यानंतर ग्राहकांना दुप्पट तिप्पट लाईट बिल येत आहे. ही महावितरण कडून ग्राहकांची एक प्रकारे लूट चालू आहे. हे सर्व मीटर फॉल्टी आहेत. त्यामुळे महावितरणच्या या कारभाराला आमचा पूर्णपणे विरोध आहे.

– संजीवन सांगळे, अध्यक्ष ,चिखली- मोशी- पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button