सिंहगड, सह्याद्री एक्स्प्रेस सुरू करा
![Start Sinhagad, Sahyadri Express](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/WhatsApp-Image-2021-09-11-at-13.36.30.jpeg)
स्लग : पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन
पिंपरी : प्रतिनिधी
सिंहगड, सह्याद्री एक्स्प्रेस सुरू करण्याचे निवेदन घेऊन पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भेटले. या बाबत सकारात्मक प्रयत्न करू, असे आश्वासन मंत्री दानवे यांनी रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकार्यांना दिले.
संघटनेचे अध्यक्ष इकबाल मुलाणी यांच्या नेतृत्त्वाखाली हे निवेदन दिले.
निवेदनात नमूद केले आहे की, पुणे-मुंबई दैनंदिन प्रवास करणार्या प्रवाशांच्या आग्रही मागणीनुसार व प्रवासी संघटनेच्या महाप्रयत्नामुळे रेल्वे प्रशासनाने दि. 26 जून 2021 पासून डेक्कन क्वीन व डेक्कन एक्सप्रेस या दोन रेल्वे गाडया सुरू केल्या आहेत. त्यामुळे पुणे-मुंबई-पुणे प्रवास करणार्या हजारों प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तथापि डेक्कन क्वीन ही गाडी सकाळी साडे दहा वाजता मुंबईत पोचते. या कार्यालयीन वेळेत डेक्कन क्वीन गाडीने प्रवास करणारे कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात पोचत नाही. त्यामुळे वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून सिंहगड व सह्याद्री एक्स्प्रेस सुरू होण्याची मागणी होत आहे. त्या बाबत त्वरीत निर्णय घेण्याची मागणी संघटनेने केली.