“ग्रँड फ्रेशर्स कार्निव्हल”ला उस्फूर्त प्रतिसाद
शिक्षण विश्व: दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे यांची उपस्थितीने विद्यार्थ्यांचा उत्साह दुणावला!

पिंपरी चिंचवड : डॉ. डी. वाय. पाटील वरळे कॅम्पसवर रंगलेल्या ग्रँड फ्रेशर्स कार्निव्हल 2025 ला मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या दमदार उपस्थितीने विशेष चमक मिळाली. तरुणाईच्या उत्साहाने भरलेल्या या कार्यक्रमाने नवागत विद्यार्थ्यांना अविस्मरणीय सुरुवात दिली
प्रवीण तरडे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या संवादातून प्रेरणादायी विचार मांडले स्वतःच्या जीवनप्रवासातील अनुभव सांगत त्यांनी मेहनत सातत्य आणि जिद्द यांचे महत्त्व अधोरेखित केले तरडे यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाने विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण केला
हेही वाचा – देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “निवडणुका पुढे ढकलण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य नाही, कुणीही…”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ सुशांत पाटील होते. तर सेक्रेटरी आणि सीईओ अनुजा पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. कॅम्पसचे सर्व संचालक प्राचार्य आणि विभागप्रमुख यांची या सोहळ्यात उत्साहपूर्ण उपस्थिती होती
प्राचार्य डॉ सुरेश माळी संचालक डॉ मेघना भिलारे, प्राचार्य डॉ सुरेश शिर्भादुरकर, डीन डॉ योगेश गुरव ,विभागप्रमुख डॉ अल्पना अडसूळ ,डॉ दिपोनिता मोंडल ,प्रा योगेश नागवेकर, डॉ अश्विनी चव्हाण, डॉ प्रीती शर्मा तसेच क्रिएटिव्ह आणि कल्चरल डायरेक्टर श्रेयस देशपांडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते




