Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

धक्कादायक! ‘मला हप्ते दे… मी इथला भाई’ म्हणत टपरीवर टोळीचा दरोडा…

  • काळेवाडीतील घटना; वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल…

पिंपरी |

सिगारेटच्या पाकिटाचे पैसे मागितल्याने कोयता घेऊन टपरी चालकाच्या अंगावर धाऊन गेले. टपरीतील सामान फेकून नासधूस केली. तसेच टपरीमधील गल्ल्यातील तीन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. दरोडा घातल्याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवनानगर, काळेवाडी येथे शुक्रवारी (दि. १२) ही घटना घडली. आदित्य संतोष चोथे, मिथुन उर्फ मितेश जाधव, सागर दिवे, सचिन उर्फ बॉण्ड (पूर्ण नाव पत्ते माहीत नाही), यांच्यासह एक अल्पवयीन मुलगा, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत दीपक पोपट मुंगसे (वय २३, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची पवनानगर येथे जोतिबा उद्यानाजवळ मामा पान शॉप नावाच्या टपरीवर आला. त्याने सिगारेटचे पाकिट घेतल्याने त्याचे पैसे फिर्यादीने मागितले. त्याचा राग त्याला आला. मला हप्ते दे. मी इथला भाई आहे, असे म्हणून त्याने कोयता हवेत नाचवला. तू माझ्याकडे परवा सिगारेटच्या पाकिटचे पैसे का मागितले. तुला आता दाखवतोच, असे म्हणून त्याने टपरीमधील सामानाची नासधूस केली. टपरीतील दिवसभराचा गल्ला सुमारे तीन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. कोयता फिरवरून रस्त्यावर दहशत निर्माण केली. त्यामुळे तेथे फिर्यादीच्या जवळ कोणीही गेले नाही. आम्हाला जे हप्ते देणार नाही त्यांची अशीच गेम करू अशी धमकी देत तो फिर्यादीच्या अंगावर कोयता घेऊन धावून आला. त्यामुळे फिर्यादी हे पळून जात असता त्याच्या साथीदारांनी त्यांचा पाठलाग करून लोखंडी रॉड हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. दरोडा घातल्याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वाचा- ‘माझा अभ्यास दांडगा, मला वनमंत्री करा’, आणखी एका नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button