Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवसेनेचे आंदोलन : ४० आमदार १२ खासदार गुजरातला न्या, मात्र ‘वेदांत-फॉक्सकॉन’ इथेच राहू द्या!

पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेलेल्या ४० आमदार आणि १२ खासदारांना पुन्हा गुजरातला न्या. मात्र, महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेऊ नका, असे आवाहन करत मोदी सरकारला आणि शिंदे-फडणवीस सरकारला महाराष्ट्रातील जनता मतपेटीतून धडा शिकवेल, अशी टीका पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेचे शहराध्यक्ष अॅड. सचिन भोसले यांनी केली.

‘वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प’ तळेगाव एमआयडीसीतून गुजरातला नेल्याच्या निषेधार्थ सचिन भोसले यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी ‘खोके सरकारचा धिक्कार असो’ ‘महाराष्ट्राचा रोजगार पळवणाऱ्या शिंदे सरकारचा धिक्कार असो’ अशी घोषणाबाजी केली. आंदोलनात माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शहर महिला संघटिका अॅड. उर्मिला काळभोर, संघटक गोविंद गोळवे, कामिनी मिश्रा, रेखा दर्शिले, धनंजय आल्हाट, वैशाली मराठे, सचिन सानप, पांडुरंग पाटील, यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

गौतम चाबुकस्वार म्हणाले, फोडा आणि राज्य करा हे ब्रिटिशांप्रमाणे भाजपची रणनीती आहे. भाजपच्याविरोधात शिवसैनिक एकजुटीने लढा देतील. तर अॅड. उर्मिला काळभोर म्हणाल्या की, बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक रोजगार पळवणाऱ्या भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

शनिवारी आदित्य ठाकरे तळेगावला आंदोलन करणार

अॅड. सचिन भोसले यांनी आंदोलनात सांगितले की, महाराष्ट्राचा रोजगार पळवणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी तळेगाव एमआयडीसीमध्ये जेथे हा प्रकल्प होणार होता, तेथे लवकरच युवा सेनेचे प्रमुख, माजी मंत्री आदित्य ठाकरे हे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होतील.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button