Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संवेदनशील आमदारांचा पुढाकार; उपचारासाठी मदत मिळाल्याने रुग्णाला जीवनदान!

कुटी मशीनमध्ये हात गेल्याने तुटलेली बोटे उपचारानंतर पुन्हा पूर्ववत

पिंपरी-चिंचवड | चिखली येथील अकरा वर्षीय मुलाची कुटी मशीनमध्ये हात गेल्याने हाताची दोन बोटे तुटली. उपचारासाठी तातडीने रुग्णालय गाठावे लागले. मात्र पैशाची अडचण उभी राहिली. अशावेळी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा भाजप नेते महेश लांडगे यांची संवेदनशीलता कामी आली. आमदारांपर्यंत दुर्घटनेची माहिती पोहोचल्यानंतर तातडीने त्यांनी मुलाला मदत देण्याची सूचना केली. या मदतीमुळे दुर्घटनाग्रस्त मुलावर तातडीने उपचार करण्यात आले आणि मुलाला एक प्रकारे जीवनदान मिळाले.

चिखलीतील यशवंत जाधव यांचे चिरंजीव सार्थक जाधव या 11 वर्षीय मुलाची कुटी मशीनमध्ये हाताची 2 बोटे गेली आणि अपघात घडला आणि त्यानंतर मुलाला तातडीने पुण्यातील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी मुलाच्या ऑपरेशन साठी तीन लाख वीस हजार रुपये खर्च सांगितला. संबंधित कुटुंबासाठी ही रक्कम मोठी होती. वैद्यकीय मदत मिळावी यासाठी या कुटुंबाने भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांचे स्वीय सहाय्यक दिपक शर्मा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने याबाबतची माहिती आमदार महेश लांडगे यांना दिली.

हेही वाचा    :    आत्मविश्वासातून व्यक्तिमत्व विकास करा; दीपक शहा 

कुठलाही वेळ न घालवता आमदारांनी मदत करण्याचे आश्वासन दिले. लांडगे यांनी संबंधित खाजगी रुग्णालयात मुलावर उपचार करण्याचे देखील सांगितले. संबंधित कुटुंबाला आर्थिक मदतही करण्यात आली यामुळे मुलावर तातडीने उपचार झाले आणि त्याला जीवनदान मिळाले.

कुटी मशीन मध्ये हात गेल्याने माझ्या मुलाच्या हाताची दोन बोटे तुटली. त्यामुळे मुलावर तातडीने उपचारांची गरज होती. पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात मुलाला नेल्यानंतर उपचाराचा खर्च आम्हाला परवडण्यासारखा नव्हता. मात्र आमदार महेश लांडगे यांनी दिलासा तर दिलाच मात्र आर्थिक पाठबळही दिले त्यामुळे आज आमचा मुलाला जीवनदान मिळाले आहे.

– यशवंत जाधव

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button