पिंपरी / चिंचवड
कैचीचा धाक दाखवून आई वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/rape-miner.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
कैचीचा धाक दाखवून तसेच आई वडिलांना मारण्याची धमकी देऊन एका अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. ही घटना 3 एप्रिल रोजी पहाटे पावणे पाच वाजता सांगवी परिसरात घडली.
याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने 13 एप्रिल रोजी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 14 वर्षीय मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पिडीत अल्पवयीन मुलगी (वय 13 वर्ष 9 महिने) ही घरात झोपली असताना अल्पवयीन मुलगा जबरदस्तीने घरात आला. त्याने मुलीला कैचीचा धाक दाखवला. त्यानंतर पिडीत मुलीच्या आई, वडिलांना मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.