पिंपरी / चिंचवड

कॉलरवर किडा असल्याचे सांगून कामगाराने पळवली मालकाची सोनसाखळी

पिंपरी l प्रतिनिधी

कामगाराला सोडण्यासाठी दुचाकीवरून जात असताना कामगाराने मालकाच्या शर्टच्या कॉलरवर किडा असल्याचे सांगून मालकाच्या गळ्यातील 45 हजारांची सोनसाखळी चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 17) रात्री बेबेडओव्हळ गावच्या हद्दीत आढले रोडवर घडली.

राहुल शंकरराव ढमाले (वय 42, रा. बेबेडओव्हळ, ता. मावळ) यांनी याप्रकरणी शिरगाव चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार कामगार शिवशंकर (रा. उत्तर प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे इंजिनिअरिंग वर्कशॉप आहे. त्यात आरोपी शिवशंकर काम करतो. शुक्रवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास त्याला घरी सोडण्यासाठी फिर्यादी त्यांच्या दुचाकीवरून जात होते. बेबडओव्हळ येथे आढले रोडवर आरोपीने ‘साहब आपके कॉलर पर किडा है’ असे म्हणून फिर्यादी यांच्या मानेवर, गळ्याला हात लावला. त्यावेळी त्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील 45 हजार रुपये किमतीची दोन तोळे सोन्याची चेन हिसका मारून तोडली आणि पळून गेला. पुढील तपास शिरगाव पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button