पिंपरी / चिंचवड

पिंपळे सौदागर येथील स्पा सेंटरवर सांगवी पोलिसांचा छापा : वेश्या व्यवसाय प्रकरणी दोघांना अटक

पिंपरी l प्रतिनिधी

पिंपळे सौदागर येथे एका स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर सांगवी पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी दोघांना अटक करून दोन महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली. ही कारवाई सोमवारी (दि 2) दुपारी साडेपाच वाजता करण्यात आली.

अविनाश शांताराम शिंदे (वय 27, रा. लोहगाव, पुणे), मॅनेजर विनोद चनप्पा जाधव (वय 27, रा. वाघमारे वस्ती, वाकड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक प्रवीण पाटील यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन येथे आवीवा स्पा या स्पा सेंटरमध्ये आरोपी स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. याबाबत सांगवी पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी सोमवारी दुपारी साडेपाच वाजता स्पा सेंटरवर छापा मारून कारवाई केली. त्यात स्पा मालक आणि मॅनेजर या दोघांना अटक करण्यात आली असून दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button