Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादीचा ‘गनिमी कावा” : भाजपाच्या नियोजित कार्यक्रमापूर्वीच ग्रेडसेप्रेटरचे लोकार्पण

  • साई चौक, जगताप डेअरी चौकातील ग्रेडसेप्रेटर केला खुला
  • शराध्यक्ष संजोग वाघेरे- पाटील यांची भाजपावर सडकून टीका

पिंपरी | प्रतिनिधी

साई चौक, जगताप डेअरी येथील ग्रेडसेपरेटरचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन होणार होते.मात्र राष्ट्रवादीने ‘गनिमी काव्या’ने या ग्रेडसेपरेटरचे बुधवारी सकाळीच उद्घाटन उरकले. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते उद्घाटन या ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन करत हा ग्रेड सेपरेटर वाहतुकीसाठी नागरिकांना खुला केला. यावेळी राष्ट्रवादीच्या वतीने भाजपवर सडकून टीका करण्यात आली.

साई चौक जगताप डेअरी ग्रेड सेपरेटरचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले.यावेळी नगरसेवक नाना काटे, मयुर कलाटे, नगरसेविका शितल काटे, सागर कोकणे,उद्योजक शिरीष साठे, सुमित डोळस, गौरव शितोळे, उत्तम धनवटे आदी उपस्थित होते. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी राष्ट्रवादीच्या कारभारावर सडकून टीका केली.

भाजपची श्रेय लाटण्याची मानसिकता- वाघेरे
पिंपळे सौदागरहून आयटी पार्क हिंजवडीला जाणाऱ्या नागरिकांना वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.या समस्येवर उपाय म्हणून राष्ट्रवादीच्या माध्यमातून येथील स्थानिक नगरसेवकांनी ग्रेड सेपरेटरसाठी वारंवार पाठपुरावा करत हे काम पूर्ण करून घेतले.मात्र भाजपला केवळ श्रेय लाटायची घाई असल्यामुळे त्यांनी या ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन करण्याचा घाट घातला. मात्र नागरिकांच्या होणाऱ्या त्रासासाठी त्यांनी कुठेही पाठपुरावा केला नाही. भाजपची मानसिकता केवळ विकास कामांचे श्रेय लाटण्याची आहे. या ग्रेड सेपरेटर मुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना आता करावा लागणार नाही.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button