विविध मागण्यासाठी आरपीआयचा पालिकेवर मोर्चा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/Vidhansabha-Election-1-780x470.jpg)
पिंपरी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे व प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत यांच्या उपस्थितीत जन आक्रोश मोर्चा पार पडला.
या मोर्चामध्ये प्रामुख्याने माता रमाई स्मारक लवकरात लवकर पूर्ण करावे, प्रत्येक झोपडीधारकांना ५०० स्क्वेअर फुट घर मिळाले पाहिजे, पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये नदीकिनारी सीमा भिंत बांधणे ज्यामुळे पुराचे पाणी नागरिकांच्या घरात जाणार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये ३००० कंत्राटी कामगारांना समान वेतन या कायद्याचे अंमलबजावणी त्वरित करावे. अशा विविध मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
हेही वाचा – Mission Vidhan Sabha Elections: राज्यात विधानसभा निवडणूक कार्यक्रम उद्या घोषित होण्याची शक्यता!
यावेळी पिंपरी-चिंचवड अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी सकारात्मक चर्चा करून ५०० स्केअर फुट घर मिळावे यासाठी प्रस्ताव तयार करुन तो शासनाकडे पाठपुरावासाठी पाठवला जाईल व इतर मागण्यासाठी सकारात्मक विचार करून व प्रत्यक्ष पाहणी करून येत्या काही दिवसांमध्ये कार्यवाहीला सुरवात करु अशी हमी दिली असल्याचा दावा वाव्हळकर यांनी केला आहे.
यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे नेते सम्राट जकाते, सिकंदर सूर्यवंशी, सुरेश निकाळजे, विनोद चांदमारे, दयानंद वाघमारे, राजू उबाळे, योगेश भोसले, रहिम कुरेशी, नवनाथ डांगे, संजय गायकवाड ,सुनील वाघमारे, राजेंद्र कांबळे, सुरेश आठवले, राघू साबळे, संभाजी वाघमारे,अतुल जाधव, मोहन मस्के, संदीप तोरणे,भारत भगत, शेखलाल नदाफ, गौतम गायकवाड, नितीन पटेकर, बाळासाहेब कोकाटे, अध्यक्ष शिरोळे, संजय सरोदे, शरद फडतरे, राघू बनसोडे, विलास गरड, दगडू क्षीरसागर, साहेबराव ससाने, गौतम जकाते, अक्षय धुनघव, शेषराव सूर्यवंशी, सत्यवान कोल्हे, रत्नमाला सावंत, ज्योती कांबळे, कविता कांबळे, विकास गाडे, किरण जाधव, आनंद गायकवाड, राजेश बोबडे, शादाब पठाण, दुर्गाप्पा देवकर, सुजित कांबळे, शेषेराव सुर्यवंशी, मदन नाईक, बाळासाहेब आंबुरे,
लक्ष्मण मुदळे, रमेश गायकवाड, सुदाम कांबळे, नारायण वानखेडे, आत्माराम सोनकांबळे, बलभीम सोनकांबळे, पंढरी खिल्लारे, सचिन जाधव, ध्रुपती सोनवणे, निर्मला कोकाटे, ललिता मंजाळ, सूर्यकांत गायकवाड, किशोर सोनवणे, सनी कांबळे, बबलू पवार, सोनी पवार यांच्यासह महिला व कामगार उपस्थित होते.