कॉलेजमध्ये पाठलाग करणा-या रोमिओने तरुणीच्या घरी जाऊन दिली पळवून नेण्याची धमकी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/crime-police-FIR.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
कॉलेजमध्ये पाठलाग करून तरुणीला लग्नाची मागणी घालत तिचा विनयभंग केला. त्यानंतर तरुणीच्या घरी जाऊन तिच्या घरच्यांसमोर तरुणीला पळवून नेण्याची धमकी दिली. हा प्रकार 18 एप्रिल रोजी चिंचवड येथे घडला आहे.
योगेश उर्फ सोन्या महाडिक (वय 25, रा. साने चौक, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या रोमिओ तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने शनिवारी (दि. 23 एप्रिल) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या महावीर चौक, चिंचवड येथील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. आरोपी हा फिर्यादी यांच्या ओळखीचा आहे. तो 18 एप्रिल रोजी दुपारी फिर्यादी यांच्या कॉलेजमध्ये आला. त्याने फिर्यादीला कॉलेजमधून बाहेर बोलावून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर फिर्यादीस लग्न करतेस का, असे विचारून तिचा विनयभंग केला.
22 एप्रिल रोजी रात्री पावणे नऊ वाजता आरोपी फिर्यादी यांच्या घरी गेला. त्यावेळी फिर्यादी यांचे काका घरी होते. ‘तुमच्या मुलीचे माझ्याशी लग्न लाऊन द्या. नाहीतर तिला मी पळवून घेऊन जाईल आणि तुम्हाला सगळ्यांना बघून घेईल’ अशी आरोपीने फिर्यादी यांच्या काकाला धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.