पिंपरी / चिंचवड

ऑनलाईन झालेली मैत्री पडली महागात; लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

पिंपरी l प्रतिनिधी

संगम डॉट कॉम या संकेतस्थळावरून मैत्री केलेल्या मित्राने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केला. तसेच तिच्याशी लग्न  न करता तिची फसवणूक केली. हा प्रकार ऑगस्ट 2021 ते 24 मार्च 2022 या कालावधीत आळंदी, कात्रज, स्वारगेट, शिरवळ या ठिकाणी घडला आहे.

गौरव प्रवीण चव्हाण (वय 25, रा. खोडवली, ता. जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने आळंदी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 23 एप्रिल) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीसोबत संगम डॉट कॉम या ऑनलाईन वेबसाईटवरून ओळख केली. फिर्यादीला लग्नाचे खोटे आमिष दाखवले. तूच मला आवडली आहे. मी तुला आयुष्यभर सुखात ठेवीन. माझी तुला सांभाळण्याची पूर्ण तयारी आहे’ असे आरोपीने तरुणीला आश्वासन दिले. तरुणीला  मंगळसूत्र घालून तिच्यासोबत दोन वेळा लग्न केले.

त्यानंतर फिर्यादीवर कात्रज, स्वारगेट, शिरवळ या ठिकाणी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध करून विश्वासघात व फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button