पिंपरी / चिंचवड

राष्ट्रीय मराठा पार्टीचा पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपाला जाहीर पाठिंबा

मिशन- PCMC : शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना दिले पाठींब्याचे पत्र

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ साठी राष्ट्रीय मराठा पार्टीने भारतीय जनता पार्टीला जाहीर पाठिंबा दिला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भोसरी विधानसभा आमदार महेशदादा लांडगे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक प्रमुख आमदार शंकरशेठ जगताप आणि पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न सिताराम काटे यांच्या उपस्थितीत हा पाठिंब्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर यांनी भाजपाला अधिकृत पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले. कार्यक्रमास राष्ट्रीय उपाध्यक्ष परमेश्वर देशमुख, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बालाजीराव पाटील देरेगावकर, पुणे शहर जिल्हाध्यक्ष ज्योतीबा सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा –  ‘नवी मुंबई हे भविष्यातील आर्थिक केंद्र; या शहराच्या विकासात कोणालाही अडथळा आणू देणार नाही’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या पाठिंब्याच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये भाजपाच्या सर्व अधिकृत उमेदवारांना राष्ट्रीय मराठा पार्टीने पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. शहराचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधा, उद्योग, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी भाजपाचे नेतृत्व सक्षम असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मतदार बंधू-भगिनींना आवाहन केले की, शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपाच्या अधिकृत उमेदवारांना मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करावे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“राष्ट्रीय मराठा पार्टीच्या पाठिंब्यामुळे भाजपाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाली आहे. पिंपरी-चिंचवडचा विकास अधिक गतीने पुढे नेण्यासाठी आम्ही सर्व घटकांना सोबत घेऊन काम करू आणि महापालिकेत स्थिर व विकासाभिमुख नेतृत्व देऊ.”

– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजपा. उमेदवार, प्रभाग- 28.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button