पिंपरी / चिंचवड
हिंजवडीत लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

पिंपरी l प्रतिनिधी
लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यांनतर तरुणीसोबत विवाह न करता दुस-या तरुणीसोबत विवाह केला. याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 28 जुलै 2021 ते 13 जानेवारी 2022 या कालावधीत बुचडे वस्ती, मारुंजी येथे घडली.
अजय राजकुमार सरवदे (वय 25, रा. विश्रांतवाडी, लातूर. मूळ रा. लातूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने गुरुवारी (दि. 20) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून तिच्या सहमती शिवाय तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यांनतर पीडित तरुणीसोबत विवाह न करता दुस-या तरुणीसोबत विवाह केला. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.





