ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

‘गुणवत्ता’ हाच क्रीडा क्षेत्रातील यशाचा कानमंत्र : सुबेदार सुखमीत सिंग

डी.एस. के. कुंजबन सोसायटीमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात

पिंपरी: क्रीडा क्षेत्रात कोणताही गरीब- श्रीमंत, जाती-धर्माचा विचार केला जात नाही. गुणवत्ता हाच क्रीडा क्षेत्रात यश मिळवण्याचा कानमंत्र आहे. त्यासाठी युवा पिढीने जिद्द आणि चिकाटी जोपासली पाहिजे, असे मत सुबेदार सुखमीत सिंग यांनी व्यक्त केले.

पुनावळे येथील डी.एस. के. कुंजबन सोसायटीमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सुबेदार सिंग बोलत होते. यावेळी सोसायटीचे चेअरमन योगेश सूर्यवंशी, सांस्कृतिक समितीचे प्रमुख युवराज पाटील, कार्यकारी समितीचे अधिकराव दिवे-पाटील, अभिजित वाळवेकर, संजय पाटील, अमेय लाटकर, विजय कांबळे आदी उपस्थित होते.

भारतमाता आणि महामानवांची प्रतिमा पूजन करून कार्यक्रामची सुरवात झाली. त्यानंतर सुरक्षा विभागाकडून ध्वजसलामी करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सुरक्षा व व्यवस्थापन विभागाचे श्रीधर पन्हाळकर, मेहताब मोमीन आणि सहकारी यांनी आयोजनमध्ये सर्वोतोपरी सहकार्य केले.

विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण…
प्रजासत्ताक दिनानिमित्त यावर्षी सोसायटीअंतर्गत वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा आणि गायन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्यांना सन्मान चिन्ह व प्रशिस्तीपत्र प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच, डॉ. प्रज्ञा पाटील यांना वैद्यकीय व सोसायटीतील विशेष योगदानबाबत “सन्मानचिन्ह” देऊन गौरविण्यात आले. सांस्कृतिक समितीच्या सुप्रिया लाटकर, प्रज्ञा पाटील, प्रियांका दिवे- पाटील, स्वप्नाली कुलकर्णी, ऋतुजा कांबळे, नेहा वाळवेकर, दीप्ती पाटील, कस्तुरी केदारी, कविता पाटील यांनी योगदान दिले. मीनाक्षी कुलकर्णी, रोहिनी सबने, लीना जाधव यांनी परीक्षक म्हणून कामकाज पाहिले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button