ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणे

पुणे : ‘पीएमआरडीए’ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेला मुदतवाढ

दि. १५ डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची संधी : आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांची माहिती

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक १२ आणि पेठ क्रमांक ३०-३२ येथील शिल्लक असलेल्या सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीत शासकीय यंत्रणा व्यस्त असल्याने नागरिकांना आवश्यक कागदपत्रे मिळण्यास वेळ लागला. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी लक्ष्यात घेता पीएमआरडीएने १५ डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे.

पीएमआरडीएच्या या गृहप्रकल्पांतर्गत पेठ क्रमांक १२ येथील प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ईडब्ल्यूएसमध्ये ४७ व एलआयजी प्रवर्गातील ६१४ सदनिका आहे. यासह पेठ क्रमांक ३०-३२ येथील ईडब्ल्यूएस (१ आरके) प्रवर्गातील ३४७ व एलआयजी (१ बीएचके) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १३३७ शिल्लक सदनिकांसाठी इच्छुकांकडून १२ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. ही मुदत संपुष्टात आल्याने प्रथम मुदतवाढ ३० नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली होती.

पण, विधानसभा निवडणूक २०२४ यात शासकीय यंत्रणा व्यस्त असल्याने नागरिकांना उत्पन्नाचा दाखला व डोमासाइल प्रमाणपत्र मिळविण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे सदनिकेच्या लॉटरी करीता अर्ज करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. त्यानुसार अर्ज करण्याची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी ही शेवटची संधी असल्याने याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button