सर्विस रस्त्यांसाठी पुनावळेकर हैराण!
नवनाथ ढवळे यांची मागणी : रस्त्यांच्या दुरूस्तीची मागणी
![Punavlekar worried about service roads](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Navnath-Dhavle-780x470.jpg)
पिंपरी | पिंपरी चिंचवड शहरातील पुनावळे भागातील एनएच-४ लगतचे सर्विस रस्ते अत्यंत दयनीय अवस्थेत आले आहेत. जागोजागी खड्डे झाले असून हे रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, या पावसाळ्याच्या दिवसात रस्त्याचे अशी दुरावस्था झाल्याने अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. या खराब रस्त्यांमुळे रोज छोटे-मोठे अपघात हे होतच असतात त्यामुळे येथील नागरिक संतप्त झाले आहेत. त्यामुळे संबंधित रस्त्यांची पाहणी करुन दुरस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी भाजपाचे उपाध्यक्ष नवनाथ ढवळे यांनी केली आहे.
सदर पुनावळे भागातील एनएच-४ लगतचे सर्व रस्ते दुरुस्त करावे, त्यांचे डांबरीकरण करावे, अशी मागणी मी पुनवळेकर संस्थेच्या वतीने नवनाथ मारुती ढवळे यांनी कार्यकारी अभियंता स्थापत्य विभाग राष्ट्रीय महामार्ग पुणे यांच्याकडे केली आहे. सदर रस्त्यांची पाहणी करून ते त्वरित दुरुस्त करून घ्यावे, असे नवनाथ ढवळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा – कुदळवाडीत डेंग्यू, मलेरियाच्या संशयित रुग्णांमुळे नागरिकांमध्ये घबराट
साई पेट्रोल पंप ताथवडे ते पवना नदी पुनावळेपर्यंतचा सर्विस रस्ता तसेच पवना नदी पुनावळे ते जीएसपीएम कॉलेज ताथवडे पर्यंतचा सर्विस रस्ता या रस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचेही दिलेल्या निवेदनात नवनाथ ढवळे यांनी नमूद केले आहे.