Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

Maharashtra Weather | सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे शेतीच्या कामांना देखील वेग आला आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस :

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणसाह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा     –      सर्विस रस्त्यांसाठी पुनावळेकर हैराण!

याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button