पुनावळे अंडरपासची दयनीय अवस्था अजूनही ‘अंडर प्रेशर’
७ ते १० वर्षांपासून मागणी, NHAI कडे सातत्याने पाठपुरावा असूनही ठोस कृती नाही

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमधील पुनावळे-ताथवडे अंडरपास ही एक दीर्घकालीन समस्या बनली आहे. गेल्या ७ ते १० वर्षांपासून या अंडरपाससाठी स्थानीय नागरिक, राजकीय नेते आणि सामाजिक संस्थांकडून सातत्याने मागणी व पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अद्यापही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) किंवा संबंधित यंत्रणेकडून कोणतीही ठोस कृती झालेली नाही, ही बाब नागरिकांच्या संतापाचा विषय बनली आहे.
दररोज लाखो नागरिकांची गैरसोय, तासन्तास ट्रॅफिक जाम, पावसाळ्यात परिसर पाण्याखाली, शालेय विद्यार्थ्यांची व ज्येष्ठ नागरिकांची मोठी कुचंबणा, आपत्कालीन सेवा अडवून ठेवली जाते, तसेच सध्या असलेली रस्त्याची अवस्था इतकी खराब आहे की, पावसाळ्यात संपूर्ण अंडरपास पाण्याखाली जातो आणि वाहतूक पूर्णतः ठप्प होते. रुग्णवाहिका, अग्निशमन दल व पोलिसांची वाहने देखील या अडथळ्यात अडकून पडतात. परिणामी नागरिकांचे दैनंदिन आयुष्य अक्षरशः ठप्प होते.
हेही वाचा : मध्यमवर्गीयांना आता GST मधून दिलासा? सरकारची १२% ऐवजी ५% स्लॅबची तयारी?
नागरिकांचे म्हणणे…
“प्रशासनाकडे शेकडो वेळा निवेदने दिली, आंदोलने केली, तरी फक्त आश्वासनेच मिळाली. प्रश्न मात्र तसाच आहे.” मंत्रालयाला पुन्हा एकदा लक्ष वेधण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. यासाठी मी पुनावळेकर उपक्रमांतर्गत या मुद्यावर लक्ष वेधले आहे. स्थानिक नागरिकांनी आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे थेट विनंती करून याप्रकरणी तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात मंत्रालयाला सादर केलेल्या निवेदनात अंडरपासची स्थिती, वाहतूक अडथळे, आपत्कालीन सेवांवरील परिणाम होत आहे, अशी माहिती राहुल काटे यांनी दिली.