ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निगडीतील स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; गुन्हे शाखेची धडक कारवाई

निगडी | निगडी येथील भक्ती-शक्ती चौक परिसरातील व्हिजन प्लस मॉलमध्ये सुरू असलेल्या स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने छापा टाकत स्पा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ७.३३ वाजण्याच्या सुमारास व्हिजन प्लस मॉलमधील ब्लू बिल्स स्पा येथे कारवाई करण्यात आली. आरोपी अमोल खंडू जाधव (वय ४०) याने स्पा सेंटरच्या नावाखाली दोन महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याचे तपासात समोर आले आहे. या अनैतिक व्यवसायातून मिळणाऱ्या पैशावर तो स्वतःची उपजीविका करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा      :            “प्रशिक्षण ही प्रक्रिया नव्हे, तर विचारांना धार देणारे माध्यम” : शत्रुघ्न काटे 

या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे कलम १४३ तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ मधील कलम ३, ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलिस हवालदार भगवंता चिंधू मुठे यांच्या पथकाने केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख करत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button