ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पोलिस शिपायाच्या भरती प्रक्रियेचा एक अनोखा फोटो व्हायरल

भरती केंद्रावर महिला उमेदवार तान्ह्या मुलाला कडेवर घेऊन दाखल

पिंपरी : राज्यात 19 जून पासून पोलिस भरती सुरु आहे. कारागृहातील पोलीस शिपायाच्या एका पदासाठी सातशेहून अधिक तरुणांनी अर्ज केले आहेत. राज्यात सर्वत्र उमेदवारांना मैदानी परीक्षांना सामोरे जावे लागत आहे. 17 हजार पदांसाठी तब्बल 17 लाख उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या पोलीस भरतीत कुठे पावसाचे तर कुठे उन्हाचे चटके सोबत उमेदवारांना मैदानी चाचण्यांना सामोरे जावे लागत आहे. या पोलीस भरतीत महिलांची संख्या देखील मोठी आहे. पुण्याच्या पिंपरी-चिंचवड परिसरातील भरती केंद्रात अजब प्रकार घडला, तेथे पोलिस शिपायाच्या भरती प्रक्रियेचा एक अनोखा फोटो व्हायरल झाला आहे. या भरती केंद्रावर एक महिला उमेदवार आपल्या तान्ह्या मुलाला आपल्या कडेवर घेऊन दाखल झाल्याचे दिसत आहे.

पुण्याला लागून असलेल्या पिंपरी-चिंचवड़मध्ये पोलीस कॉन्स्टेबल भरती सुरु आहे. या भरती प्रक्रियेत एक अनोखा फोटो व्हायरल झाला आहे. पोलीस कॉन्स्टेबल बनण्याचे स्वप्न पाहणारी एक महिला तिच्या चार महिन्यांच्या बाळालाच घेऊन भरतीसाठी दाखल झाल्याचे पाहून अधिकारी अवाक् झाले आहेत. ज्यावेळी तिच्या मैदानी चाचणीची वेळ आली आहे. तेव्हा भरती प्रक्रियासाठी फील्डवर टेस्ट देताना तिच्या जवळच्या अवघ्या चार महीन्यांच्या तान्ह्या बाळाला कुठे ठेवायचे याचा प्रश्न तिच्या मनात उत्पन्न झाला. कारण तिच्या सोबत कोणीही नव्हते. तेव्हा ड्यूटीवर तैनात महिला पोलिसाला अखेर तिची अडचण समजली आणि त्या महिला पोलिसांनी त्या बाळाला स्वत:कडे घेत त्याला जोजावले आणि बाळ देखील लगेत शांत झालं..हा फोटो हृदय पिळवटणारा आहे. एका मातेचं मन दुसरी माताच जाणू शकते अशा भावना दर्शविणारं हे छायाचित्र बोलकं आहे.

सरकारी नोकरी
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी तरुणांची गर्दी होत आहे. साध्या ‘बॅण्ड्स मन’ पदासाठी देखील शेकडो उमेदवार अर्ज करीत आहेत. सर्वाधिक पदे पोलीस कॉन्स्टेबलसाठी आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक तरुण आणि तरुणी पोलिस कॉन्स्टेबल भरतीसाठी दाखल झाले आहेत. पिंपरी- चिंचवड संत ज्ञानेश्वर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पोलिस भरती चालू आहे. पोलिस महिलांची मैदानी चाचणी झाली आहे.ज्यात पहिल्या दिवशी 864 महिलांनी सहभाग घेतला. यातील 729 महिलांच्या मैदानी चाचणी झाल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button