एम एस एस हायस्कूलमध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

चिंचवड : चिंचवड येथील माटे हायस्कूलमध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन संस्थेच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरण साजरा करण्यात आला .कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे व मान्यवर संस्थेचे पदाधिकारी यांचे टाळ्या व ढोल यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यानंतर भारत मातेचे पूजन करून प्रमुख पाहुणे एडवोकेट डॉ.मा.राजेंद्र गोडबोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. राष्ट्रगीत व ध्वजगीत सादरीकरणानंतर स्काऊट गाईड आणि एम सी एफच्या पथकांनी उत्कृष्ट संचलनाद्वारे राष्ट्रध्वज आणि मान्यवरांना मानवंदना दिली .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोरया शिक्षण संस्थेच्या कार्यवाह, तहयात विश्वस्त तथा प्राचार्या मा.इंद्रायणी माटे- पिसोळकर यांनी केले. त्यांनी प्रजासत्ताक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट करत व भारतीय संविधानाच्या मूल्याची जाणीव करून दिली. पाहुण्यांचा परिचय व स्वागत शाळेच्या पर्यवेक्षिका सौ .मैत्रेयी राजे यांनी केले. विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक व सुंदर असे साधन कावत प्रकार सादरीकरण करून उपस्थितांची व मान्यवरांची मने जिंकली.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला अंध फुटबॉल स्पर्धेमध्ये सर्वात जास्त वेळा निवड झालेली खेळाडू ,इंग्लंड ,जपान या देशात जाऊन भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या ,दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप साठी खेळ णाऱ्या ,कुमारी कोमल गायकवाड आणि इंग्लंडमध्ये भारत विरुद्ध जर्मन या अंध फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघाची कर्णधार राहिलेल्या कुमारी दिपाली कांबळे या होत्या. यांनी आपल्या भाषणात प्रयत्नाने सर्व अडचणींवर मात करता येते आत्मविश्वास आणि एकीच्या बळावर यश मिळवता येते हे सांगितले .प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आदर्श पालक म्हणून श्री प्रकाश देशिंगे व सौ अनुराधा देशिंगे यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्र निर्मितीत विद्यार्थी आणि युवकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले .
हेही वाचा – “भारतीय स्ट्रीट फूडचा उत्सव – द ग्रेट इंडियन कार्निव्हल”

यानंतर तरुण नव संशोधक शार्दुल देशिंगे व तनय शहाडे या विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर संशोधन व विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले. शार्दुल देशिंगे याचा प्रकल्प इन्स्पायर अवॉर्ड स्पर्धेसाठी निवडला गेला याशिवाय डी. वाय .पाटील आंतरशालेय प्रकल्प स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचा मानाचा करंडक त्याने पटकावला, एसबी पाटील ब्रेन वेवज आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला ,तसेच स्पार्क 2026 च्या अंतिम फेरीसाठी शार्दुल देशिंगे 8वी ब याचा संशोधन प्रकल्प निवडला गेला .तर तनय शहाडे 9वी अ यांनी आंतरशालेय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले, सन्मानित करण्यात आले या यशामुळे शाळा ,पालक ,विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण असून भविष्यात हे विद्यार्थी विज्ञान संशोधन क्षेत्रात देशाचे नाव उज्वल करतील असा विश्वास प्रमुख पाहुणे एडवोकेट डॉक्टर राजेंद्र गोडबोले यांनी व्यक्त केला
विद्यार्थ्यांच्या बरोबरच शिक्षकांनी सुद्धा बाह्य राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन प्राविण्य प्राप्त केली त्यामध्ये सौ निर्मला बागल यांचा राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविल्याबद्दल तर कोल्हे मॅडम यांचा भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेला जास्तीत जास्त विद्यार्थी बसविण्याचा विक्रम केल्याबद्दल सत्कार करण्यात आला

तसेच यावर्षीचा मोरया शिक्षण संस्थेचा अत्यंत मानाचा अष्टपैलू शिक्षक पुरस्काराने स्काऊट मास्टर उपशिक्षक श्री हनुमंत हुचगोळ यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला मोरया शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री स्वप्निल शेडगे , खजिनदार श्री रणजीत सावंत ,माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री नवीत झेंडे ,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री विशाल कांबळे ,माता पालक संघाच्या सदस्या सौ अर्चना क्षीरसागर,सौ. मिलन शाळेचे उप मुख्याध्यापक श्री दिलीप कुमावत पर्यवेक्षिका मैत्रीय राजे शिक्षक समन्वयक श्री संजय खेडकर अंध अपंग कल्याण आश्रमाचे व्यवस्थापक श्री मधुकर इंगळे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक व नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्काऊट मास्टर श्री हनुमंत हुचगोळ यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापक श्री दिलीप कुमावत यांनी मानले.




