PCMC: चिखलीतील महापालिका टाऊन हॉल अखेर नागरिकांसाठी खुला!
सुखद अन् दिलासादायक : माजी नगरसेवक कुंदन गायकवाड यांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी- चिंचवड : चिखली येथील महापालिका टाऊन हॉल व व्यायामशाळेचे दीड वर्षा पूर्वी उद्घाटन होवूनसुद्धा हा टाऊन हॉल आणि व्यायामशाळा सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे, परिसरातील नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रम, शाळेचे गॅदरिंग, मनोरंजन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अडचणी येत असल्याचा मुद्दा उपस्थित करून माजी नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी महापालिका प्रशासनाकडे प्रचंड पाठपुरावा केला. अखेर यांच्या मागणीला यश आले आहे आणि टाऊन हॉल नागरिकांना खुले करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने चिखली येथे टाऊनशिप आणि व्यायाम शाळा उभारले आहे मात्र गेल्या दीड ते दोन वर्षांपासून हे उपक्रम लोकांसाठी खुले करण्यात आलेले नव्हते. या प्रकल्पांना नागरिकांसाठी सुरू करण्यात यावे यासाठी भाजपचे माजी नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि उपायुक्त विजयकुमार खोराटे यांना याबाबत निवेदन दिले होते .
हेही वाचा : हिंदूंनी पारंपारिक कपडे घालावेत आणि इंग्रजी बोलू नये; मोहन भागवत यांचं वक्तव्य चर्चेत
याबाबत माजी नगरसेवक कुंदन गायकवाड म्हणाले पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून सोनवणे वस्ती रोड, चिखली येथील टाऊन हॉल आणि व्यायामशाळा उभारण्यात यावे यासाठी आम्ही भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून प्रचंड पाठपुरावा केला. मोठ्या पाठपुराव्यामुळे प्रभाग क्रं १ मध्ये टाऊनशिप आणि व्यायाम शाळा उभारली गेली.
आमदार आणि प्रशासनाचे आभार…
समाविष्ट गावांमधील या पहिल्याच टाऊन हॉलचे काम फेब्रुवारी 2023 मध्ये पूर्ण झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण देखील झाले.मात्र, गेले दीड वर्षे उद्घाटन होवूनसुद्धा हा टाऊन हॉल आणि व्यायामशाळा सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध झालेली नव्हते. परिणामी, परिसरातील नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रम, शाळेचे गॅदरिंग, मनोरंजन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अडचणी येत होत्या. नागरिकांची मागणी लक्षात घेऊन तातडीने हे प्रकल्प लोकांसाठी खुले करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला होता. आता टाऊन हॉल सुरू करण्यात आला आणि व्यायामशाळा 15 दिवसांत खुली करण्यात येणार आहे. यामुळे प्रशासन आणि भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांचे आभार नागरिक व्यक्त करत आहेत असे गायकवाड यांनी म्हटले आहे.